जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२१ । कालपासून मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू झाला असून मुस्लिम बांधवांना नमाज अदा करण्यासाठी सकाळी लवकर उठावे लागते. पण आजाद नगर भागात लाईटची व्यवस्था नसल्याने तेथे अंधार असायचा. त्यामुळे तेथील नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत होते.
त्यामुळे आजादनगर चे माजी नगरसेवक जाकिर पठाण यांनी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्याकडे आजादनगर मध्ये अंधार होत असल्याने या समस्येची तक्रार केली असता तेथे एलईडी लाईट लावून देण्याची मागणी मागणी केली असता त्याठिकाणी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी तात्काळ एलईडी लाईट बसवून देण्याचे आश्वासन दिले आणि त्या कामास आज प्रत्यक्षात सुरुवात देखील झाली.