⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

शिवसेना गटारीतले बेडूक – गिरीश महाजन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | १५ मे २०२२ | संपूर्ण भारताने भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी यांना सर्टिफिकेट दिले आहे. तुम्हाला मोदींवर बोलण्याचा अधिकार आहे का? तुमची कुवत आहे का? तुम्ही गटारीतले बेडूक आहात. अशा शब्दात माझी जलसंपदामंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे आमदार गिरीश महाजन यांनी शिवसेनेवर टीका केली.

शिवसेनेने सुरू केलेल्या शिव संपर्क अभियानांतर्गत मुख्यमंत्री ठाकरे यांनी शनिवारी मुंबईत शिवसेनेची भव्य अशी सभा घेतली होती. या सभेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी हिंदुत्व केंद्रीय यंत्रणा यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना आज धुळ्यामध्ये गिरीश महाजन यांनी शिवसेनेवर टीका केली.

यावेळी ते म्हणाले की, तुम्ही गटारीतले बेडूक आहात समुद्रामध्ये काय चालले आहे. ते बघा आज संपूर्ण देश पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात कडे पहात आहे. अशी टीका महाजन यांनी केली.