⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | हवामान | मान्सून संदर्भात मोठी अपडेट ; येत्या 48 तासांत मान्सून बंगालच्या उपसागरात दाखल होणार

मान्सून संदर्भात मोठी अपडेट ; येत्या 48 तासांत मान्सून बंगालच्या उपसागरात दाखल होणार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२२ । वाढत्या तापमानाने हैराण झालेल्या नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. कारण मान्सून (Monsoon) संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली असून येत्या 48 तासांत मान्सून बंगालच्या उपसागरात दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून (Indian Meteorological Department) वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे आता लवकरच मान्सूनपूर्वी पाऊस (rain) होण्याची शक्यता वाढली असून महाराष्ट्रातही मान्सूनपूर्व सरी लवकरच बरसतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

यंदा मान्सून १० दिवस आधीच आगमन होणार आहे. त्यामुळे राज्यात मागील अनेक दिवसांपासून उच्चांकी तापमानात लाहीलाही झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या आठवड्यातच भारतीय हवामान विभागाने यंदा मान्सून वेळेआधीच दाखल होण्याचा अंदाज वर्तवला आहे. दरवर्षी अंदमानमध्ये २२ मे पर्यंत मान्सून दाखल होतो. पण यंदा १३ ते १९ मे दरम्यान मान्सूनला सुरुवात होणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

केरळमध्ये २० ते २६ मेपर्यंत पाऊस दाखल होईल. तर तळकोकणात २७ मे ते २ जूनपर्यंत मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुखे कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करत मान्सूनच्या आगमनाबाबत ही माहिती गुरूवारी दिली.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.