⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

मोठी बातमी ! शासकीय वैद्यकीय रुग्णालयातून लॅपटॉपसह दोन मोबाईल लंपास

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मे २०२२ । जळगाव शहराच्या निकट असलेल्या मोहाडी येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयातून चोरट्यांनी लॅपटॉप आणि दोन मोबाईल लांबवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरापासून जवळच असलेल्या मोहाडी येथील शासकीय हॉस्पिटलमध्ये अशोक नाथू पासवान (42, धरमपुरा ठिका, ता.जि.वैशाली बिहार, ह.मु.मोहाडी) हे काम करतात. बुधवार, 11 मे रेाजी मध्यरात्री एकच्या सुमारास त्यांच्या शासकीय हॉस्पिटलच्या कार्यालयात ठेवलेले 15 हजार रुपये किंमतीचा लॅपटॉप आणि प्रत्येकी पाच हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल असा एकूण 25 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल संशयीत शत्रूघ्न मनौत महतो (रा. तुरकी चरूवा, जि.मुझफरपूर, बिहार) याने चोरून नेल्याचा संशय अशोक पासवान यांनी व्यक्त केला आहे.

अशोक पासवान यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेवून संशयिताविरोधात तक्रार दिल्याने पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस नाईक मुदस्सर काझी करीत आहे.