जळगाव लाईव्ह न्युज | १२ मे २०२२ | टिक टॉक आणि इंस्टाग्राम वर रिल बनवण्याची हाऊस सध्या प्रत्येका माणसाला आली आहे. याच गोष्टीचा फायदा घेत अमेरिकेतील नोर्थ कॉरोलायना या परदेशातील विद्यापीठाने आपल्या कॅम्पस मध्ये टिक टोक व्हिडिओ बनवण्याचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. बिल्डिंग ग्लोबल ऑडियन्स असं या अभ्यासक्रमाचा नाव आहे. मात्र सामान्य भाषेत या अभ्यासक्रमाचे नाव टिक टोक क्लास असं ठेवण्यात आल आहे.
अभ्यासक्रम पदवीचा अभ्यास पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी असल्याचं सांगितलं गेलं आहे तर सोशल मीडियावर आपला वावर वाढवण्यासाठी या वर्गात प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
सध्याच्या पिढीमध्ये टिकटॉकच आकर्षण लक्षात घेता विद्यार्थ्यांमध्ये याबाबतची असणारी रुची लक्षात घेता हा अभ्यासक्रम तयार केला गेला असल्याचं म्हटलं जात आहे.
आतापर्यंत या अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी टिक टोक वर १ लाखाहून अधिक फॉलोवर्स मिळवले आहेत. तर या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध व्हिडिओला 80 मिल्लियन होऊन जास्त मिळाले आहेत. नतालिया हॉजर नावाच्या एका विद्यार्थिनीने एका सेमिस्टरमध्ये १२ हजार फॉलोअर्स मिळवले. तिला सध्या दोन लाख 27 हजार फॉलोवर्स फॉलो करतात ती यावरून महिन्याला ५ लाखांपर्यंतची कमाई करते. तिला अनेक कंपन्यांकडून पोस्टसाठी पैसे दिले जातात. कंपन्यांसोबत व्यवहार कसा करावा हे देखील विद्यार्थ्यांना यामध्ये शिकवलं जातं.