⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

तुमची मुलगी व्हॉलीबॉल खेळते आहे ? तर तुमच्यासाठी हि एक सुवर्ण संधी आहे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

                जळगाव लाईव्ह न्युज | ११ मे २०२२ | महाराष्ट्र राज्यात व्हॉलीबॉल खेळाची एक परंपरा आहे. आपल्या राज्यातुन हा खेळ स्पर्धात्मक व मनोरंजनाच्या माध्यमातुन खेळला जातो. यातुनच आपल्या जिल्ह्यातील अनेक खेळाडु निर्माण झालेले आहेत. सद्यस्थित दिनांक 22  एप्रिल ते 11 मे,2022 या कालावधीत मुलींसाठी 20 दिवसांचे व्हॉलीबॉल प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलेले होते. त्यानुसार व्हॉलीबॉल खेळ व खेळाडुचा विचार करुन विभागाने खेळाड शोध प्रक्रियेतुन 16 वर्षातील मुलींसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन शिवछत्रपती क्रीडा संकुल, पुणे येथे करण्यात येणार आहे.

प्रशिक्षण शिबिरात तामिळनाडू येथील आंतराष्ट्रीय प्रशिक्षकपी.सी पांडियन यांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळणार असुन. विविध स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी उपलब्ध होणार आहे. भविष्यात सदर प्रशिक्षण शिबिरातील खेळाडुंना परदेशी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन व प्रशिक्षणाच्या सोयी सुविधा उपलब्ध होउ शकेल. सदर प्रशिक्षण शिबिराकरिता जिल्ह्यातुन 01 –सेंटर, 02 –अटॅकर, 02-युनिव्हर्सल /ब्लॉकर या खेळातील स्थानाप्रमाणे / खेळाडुंच्या खेळातील खेळण्याची जागा यानुसार उत्तम असे एकुण पांच खेळाडुंची निवड प्राविण्याच्या आधारे करण्यात येणार आहे. सदर निवड चाचणीत सहभागी होण्यासाठी शाळेत शिकत असलेल्या किंवा नसलेल्य 16 वर्षातील मुली खेळाडुचा जन्मदिनांक 1 जानेवारी, 2007 रोजी किंवा  त्यानंतर जन्मलेला  असावी व तिची उंची 175 सेमी, असावी, त्याचप्रमाणे सन 2019-20 मध्ये व्हॉलीबॉल या खेळाच्या जिल्हास्तर, विभागस्तर व राज्यस्तर स्पर्धेतील प्रथम चार  क्रमांकाच्या शाळेतील 16 वर्षातील वयोगट व उंची 175 सेंमी, अशी उंचीची अट पूर्ण करत असल्यास अशा खेळांडू मुलींनी निवड चाचणीत सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे ओमप्रकाश बकोरीया,  यांनी केले आहे.

             निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळा, महाविद्यालये, संस्था, आदिवासी प्रकल्प, क्रीडा मंडळे व विविध क्रीडा संघटना यांनी शाळेत शिकत असलेले किंवा नसलेल्या व्हॉलीबॉलच्या मुली खेळाडुंनी संपुर्ण नाव, गावाचे नाव व पत्ता, जन्मदिनांक, आधारकार्ड क्रमांक, उंची (सेमी), खेळण्याचे स्थान/ जागा, मोबाईल क्रमांक, ईमेल इत्यादी आवश्यक माहिती व जन्मतारखेकरिता आवश्यक आधारकार्ड / जन्मदाखल्याच्या कागदपत्रांसह 19 मे, 2022 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे सकाळी 8 वाजता उपस्थित राहण्याचे सुचित करावे, तसेच अधिक माहितीसाठी मिनल थोरात ( राज्य क्रीडा मार्गदर्शक) 8625946709 यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी  मिलिंद दिक्षित, यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.