जळगाव लाईव्ह न्यूज ।पाणीटंचाई विशेष । सध्यास्थितीत जिल्ह्यातील २ तालुक्यातील ३ गावांना टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू आहे. चाळीसगाव तालुक्यातील हातगाव भिल्ल वस्ती, पिंपळगाव आणि भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे टँकरने ग्रामस्थांना पाणीपुरवठा सुरू आहे.
मे महिन्यातही जिल्ह्यात फक्त तीनच गावांना सध्या टँकर पाणीपुरवठा सुरू असल्याने जळगाव जिल्हावासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात दोन बोरवेल आणि २ विंधन विहीरीसह १५ विहिरींचे अधिग्रहण एकूण १८ पाण्याचे स्त्रोत अधिग्रहित करण्यात आले आहे. जामनेर तालुक्यातील बोरगाव, शेळगाव येथे बोअरवेल तर पळासखेडा काकर, नवी दाभाडी, वडगाव बु., हिवरीदिगर, नेरी दिगर, खडकी, वाकोद या ठिकाणी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
तसाच मुक्ताईनगर तालुक्यात तालखेडा, वायला तर चाळीसगाव तालुक्यातील राजदेहरे तुका नाईक तांडा, राजदेहरे या गावात विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. तसेच भडगाव तालुक्यातील आंचळगाव, धोत्रे येथे प्रत्येकी एक विंधन विहीर अधिग्रहित करण्यात आली आहे. एरंडोल तालुक्यातील गालापूर, विखरण या दोन ठिकाणी विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील टंचाईची स्थिती
टँकर ३
गावे ३
अधिग्रहित विहिरी १८