जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मे २०२२ । धावत्या स्वराज एक्प्रेसमध्ये वॉशरूममध्ये एका २० वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची खळबळजनक बातमी समोर अली आहे, अधिक माहिती अशी कि, धावत्या रेल्वेत एका २० वर्षीय तरुणीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याची घटना रविवारी दुपारी एकच्या सुमारास समोर आली . संबंधित तरुणीसोबत एक व्यक्ती आणि लहान मुलगा बोरीवलीपासून सोबत प्रवास करत होते. पण ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यापासून दोघंही फरार आहेत.
संबंधित तरुणी स्वराज एक्स्प्रेसमधील वॉशरूम कोचमध्ये गेली होती. पण बराच काळ उलटूनही ती परत आली नाही. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी शोधाशोध केली असता मिळाली नाही. दरम्यान रेल्वेतील कर्मचाऱ्यांनी संबंधित कोचचा दरवाजा उघडला असता, २० वर्षीय तरुणी लटकलेल्या अवस्थेत आढळली आहे.
संबंधित रेल्वे मुंबईतील वांद्रे टर्मिनस ते जम्मू-काश्मीरमधील श्री माता वैष्णो देवी कटरापर्यंत जाणार होती. दरम्यान रविवारी दुपारी सव्वा एकच्या सुमारास धावत्या रेल्वेत २० वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला.