⁠ 
गुरूवार, मे 9, 2024

सामाजिक न्याय मंत्री मुंडेंसह नारिकांनी दिला जातीय सलोख्याचा संदेश

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मे २०२२ । येथील पोलिस स्टेशनच्या वतीने जिल्हा पोलिस अधीक्षक प्रविण मुंढे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या जातीय सलोखा स्वाक्षरी मोहिमेस सर्वसामान्य नागरिकांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे,आ.अनिल भाईदास पाटील यांनीही या मोहीमेत संदेश लिहून सहभाग नोंदवला.


शहरात तिरंगा चौक येथे दिनांक ७ मे रोजी सकाळी ९.००. वाजेपासून मोहीम राबवण्यास सुरुवात झाली. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे शनिवारी शहरात असल्याने त्यांनीही यात सहभाग नोंदवला. त्यांच्याबरोबच माजी आमदार साहेबराव पाटील,एजाज गफ्फार मलिक, डॉ अनिल शिंदे,नगरसेवक हाजी शेखा मिस्त्री, राजेश पाटील, श्याम पाटील, विवेक पाटील, सुरेश पाटील, ऍड यज्ञश्वर पाटील,देविदास देसले,यांनी या मोहिमेत सहभाग नोंदवला. तसेच शहरातील व तालुक्यातील सर्व राजकीय पक्षाचे नेते-कार्यकर्ते, सामाजिक व धार्मिक संघटना, पत्रकार बांधव, विविध संस्थेचे ट्रस्टी, रोटरी क्लब, जॉगिंग ग्रुप, शैक्षणिक संस्था, विद्यार्थी, शिक्षक, डॅाक्टर्स, वकील, इंजीनियर, व्यापारी, शांतता व महीला समिती सदस्य, पोलीस पाटील, ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य , पोलीस मित्र, महिला संघटना व सर्व जाती धर्माचे नागरिक, महिला व मुले, सराफ-व्यापारी असोसिएशन, प्रिंटींग असोसिएशन, सर्व सामाजिक-सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील मान्यवर तसेच अमळनेर शहर व तालूकावासीयांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून संदेश देत स्वाक्षरी केली. मोहिमेच्या यशस्वीतेसाठी पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ शरद पाटील, रवी पाटील, दीपक माळी, यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

या स्वाक्षरी मोहिमेत विविध मान्यवरांनी आपले संदेश लिहून स्वाक्षरी केली. त्यामुळे या संदेशांची शहरात विशेष करून चर्चा होती. त्यात खास अशा संदेशावर अनेकजण चर्चा करताना दिसून आले. यात वो दिलो मे आग लगायेगा, मै दिलोंको आग बुझाऊंगा, उसे अपणे काम से काम है. मुझे अपणे काम से काम हे, जय हिंद, जय महाराष्ट्र असा संदेश सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी लिहिला. तर कोई धर्म बुरा नही होता, इंसान बुरा होता है…और बुरे इंसान का कोई धर्म नही होता, असा संदेश पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी लिहिला.