जळगाव लाईव्ह न्यूज । १४ एप्रिल २०२१ । शहरातील रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या आवारात विविध कंपन्यांच्या बारा दुचाकी जमा आहेत. दरम्यान, या दुचाकी खराब होऊन मूल्यहीन होत चालल्या आहेत. या दुचाकींच्या मालकांनी कागदपत्रांची पूर्तता करुन सात दिवसांच्या आत घेऊन जाव्यात. अन्यथा त्या दुचाकींचा लिलाव करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
या बारा दुचाकी मधील काही दुचाकींवर वाहन क्रमांक आहे. काही दुचाकींचा इंजिन क्रमांक समजून येत नाही. एका दुचाकीचा चेसिस क्रमांकही समजत नसल्याचे पोलिसांनी पाठवलेल्या प्रसिध्दी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.