जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मे २०२२ । महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनतर्फे पुण्यात आयोजित राज्य अजिंक्यपद दहाव्या सब-ज्युनियर मुले-मुलींच्या स्पर्धेत महाराष्ट्रा मधील विविध ज्युनियर कॉलेजच्या विध्यार्थानी सहभाग नोंदवला त्यात जळगावातील बॉक्सिंग असोसिएशनच्या खेळाडूंनी सहभाग नोंदवून दोन कांस्यपदक, रौप्यपदक पटकावली.
त्यात ४८ ते ५० किलो वजनगटात कार्तिकी पाटीलने कांस्यपदक, ५४ ते ५७ किलो वजनगटात त्रिवेणी पाटीलने रौप्यपदक पटकावले. प्रशिक्षक म्हणून नीलेश बाविस्कर व व्यवस्थापक पीयूष भोसले यांनी काम पाहिले आहे. खेळाडू व प्रशिक्षकांचा महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन उपाध्यक्ष मनोज पिंगळे, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, शहर बॉक्सिंग असोसिएशन अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, उपाध्यक्ष डॉ. अमोल पाटील, सहसचिव नयन राणे, खजिनदार रोहिदास पाटील, रवी नरवाडे, संतोष सुरवाडे, डॉ. सचिन वाणी, डॉ. सारिका वाणी, सूरज नेमाडे, राकेश पाटील, विशाल बाविस्कर, विजय पाटील, शुभांगी भोसले, शारदा पाटील यांनी त्यांचा गाैरव केला.
.