⁠ 
रविवार, डिसेंबर 15, 2024
Home | हवामान | तापमानाच्या उच्चांकाने मोडला १२२ वर्षांचा विक्रम, एप्रिलमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद

तापमानाच्या उच्चांकाने मोडला १२२ वर्षांचा विक्रम, एप्रिलमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ मे २०२२ । यंदा एप्रिल महिन्यात उष्णतेने उच्चांक गाठला आहे. या वर्षीचा एप्रिल हा भारतातील गेल्या 122 वर्षांतील सर्वात उष्ण महिना ठरला आहे. देशातील अनेक राज्यात तापमानाने उच्चांक गाठला असून उन्हाच्या तडाख्यामुळे जनता हैराण झाली आहे.

दरम्यान, यंदा मार्च महिन्यातच देशातील इतर राज्यांसह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ४० अंशावर गेला होता. तर एप्रिल महिन्यात त्यात वाढ होऊन तो ४६ अंशावर गेला. यंदा मे महिन्यात राहणारी उन्हाची तीव्रता एप्रिल (April) महिन्यातच दिसून आली. त्यामुळं सर्वाधिक उष्ण असा मे महिना कसा जाणार, याची चिंता नागरिकांना वाटू लागली आहे. सकाळपासूनच तापमानाचा पारा कमालीचा वाढत असल्याने कडक उन्हात घामाच्या धारा वाहत आहेत. सकाळच्या वेळी रस्त्यावर वर्दळ दिसत असली तरी दुपारी मात्र रस्त्यावर अघोषित कर्फ्यु लागल्याचं चित्र पाहायला मिळते. रस्त्यावर शुकशुकाट असतो.

हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार मे महिन्यात, उत्तर-पश्चिम, मध्य, पूर्व आणि ईशान्य भारताच्या बहुतेक भागांमध्ये सामान्य किमान तापमान राहण्याची शक्यता आहे. तर दक्षिण द्वीपकल्पीय भारत आणि वायव्य भारताच्या काही भागांमध्ये सामान्य किंवा सामान्य किमान तापमान सामान्य राहण्याची दाट शक्यता आहे. आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्र यांनी सांगितले की, मे महिन्यात राजस्थान, गुजरात, दिल्ली, पंजाब, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये उष्ण वारे वाहत राहतील.

या वर्षीचा एप्रिल महिना 1900 नंतर भारतातील चौथा सर्वाधिक उष्ण महिना होता. तर भारताच्या उत्तर-पश्चिम आणि मध्य भागात एप्रिल हा 122 वर्षांतील सर्वात उष्ण ठरला आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.