जळगाव लाईव्ह न्यूज । ३० एप्रिल २०२२ । माजी खासदार अॅड शिवाजी माने (Shivaji Mane) यांनी सहाव्यांदा पक्ष बदलला असून आता शिवसेनेला जय महाराष्ट्र ठोकत नुकताच भाजपामध्ये (BJP) प्रवेश केला. मुंबईत केंद्रीय मंत्री नारायण राणे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससह (Devendra Fadanvis) आदींच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला. अॅड शिवाजी माने शिवसेनेकडून दोनदा खासदार राहिलेले आहे.
दरम्यान, शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं, महाराष्ट्रातल्या जनतेला त्रास द्यायला सुरवात केली, मुळात आता सगळेच मुद्दे सोडलेले आहेत. म्हणून मी शिवसेना सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला. 2019 च्या सभेमध्ये मला उद्धव ठाकरे यांनी जुलमाचं शिव बंधन बांधलं. मी त्यांना शिव बंधन बांधा म्हणलो नव्हतो…असंही अॅड. शिवाजी माने म्हणाले. ही तर सुरुवात आहे येणाऱ्या काळात अजून कित्येक जण शिवसेना सोडतील. माझ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसल्याने मी शिवसेना सोडली आहे, असेही ते म्हणाले आहे.
कोण आहेत अॅड. माजी खासदार शिवाजी माने?
शिवाजी माने हे 1996 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर खासदार झाले. 12 व्या आणि 14 व्या लोकसभेत ते खासदार म्हणून निवडून आले. 2006 च्या दरम्यान त्यांनी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांवर 2004 च्या लोकसभेच्या निवडणुकीत पराभवाचं खापर फोडत शिवसेना सोडली. 2008 ला ते काँग्रेसमध्ये गेले. कॉग्रेसने त्यांना जिल्हा अध्यक्ष पदाची जाबाबदारी दिली होती. त्या वेळी त्यांनी काँग्रेसचे बहुसंख्य जिल्हा परिषद सदस्य निवडून आणले होते. नंतर कॉग्रेस मध्ये राजीव सातव अॅक्टिव्ह झाले. त्यामुळे पक्षात माने आणि सातव यांचे जमत नसल्याने माने यांनी 2014 साली कॉग्रेसला राम राम ठोकला व राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. 2015 च्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीने माने यांना एकही तिकीट दिलं नसल्याने माने पुन्हा नाराज झाले. त्यांनी 15 ते 2019 पर्यंत त्यांनी राष्ट्रवादीत दिवस काढले. पुन्हा 2019 च्या निवडणुकीत घर वापसी केली. आमदार संतोष बांगर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आखाडा बाळापूर येथे सभेसाठी आले असता त्यांनी भर सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला होता. पुन्हा आता त्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला.