⁠ 
सोमवार, डिसेंबर 16, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | मनपा अभियंता भोसले बडतर्फ

मनपा अभियंता भोसले बडतर्फ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० एप्रिल २०२२। येथील महापालिकेचे सहायक अभियंता अरविंद भोसले यांना बडतर्फ करण्यात आले असून शाखा अभियंता गोपाळ लुले यांना पदावनत करण्यात आले असल्याचे आदेश नुकतेच जारी करण्यात आले आहे.

महापालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी सेवानिवृत्त होत असतांना याआधी त्यांनी एका निर्णयाच्या माध्यमातून सहायक अभियंता अरविंद भोसले यांना बडतर्फ केले असून शाखा अभियंता गोपाळ लुले यांना पदावनत करण्यात केले याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. सहा वर्षांपुर्वी नगररचनाचे सहायक संचालक चंद्रकांत निकम यांच्या बचावासाठी त्याच विभागाच्या सहा अभियंत्यांनी आयुक्तांना पत्र दिले होते. त्यात सहायक अभियंता अरविंद भोसले, पाणीपुरवठाचे प्रमुख अभियंता गोपाळ लुले यांच्यावर तत्कालिन प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी बडतर्फीची कारवाई केली. या कारवाईच्या विरोधात दोघांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. यावर झालेल्या सुनावणीत सदर कारवाई करताना आयुक्तांनी प्रशासकीय प्रक्रीया पार पाडली नसल्याचे न्यायालयाने म्हटले होते. त्यामुळे चौकशी अहवाल दिल्यानंतर दोघांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले होते.

काही दिवसांपूर्वीच आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी दोघांना बडतर्फ का करण्यात येऊ नये? अशा आशयाची नोटीस दिली होती. त्यात लुले यांनी म्हणणे सादर केले होते. तर भोसले यांनी रजेचा कालावधी वाढवून घेतला होता. आयुक्तांनी गुरुवारी न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पुर्वीच्या आयुक्तांची कारवाई कायम ठेवत भोसलेंवर बडतर्फीची कारवाई केली असून लुले यांना पदावनत करण्यात आले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.