जळगाव लाईव्ह न्यूज । ३० एप्रिल २०२२ । पाचोरा येथे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत समर व्हॅकेशन क्लासेस चे आयोजन करण्यात आले आहे. येथील कै. परशराम कोंडीबा शिंदे बहुउद्देशीय मंडळ व भाजपा युवा मोर्चा पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने व कृ.उ.बा.समितीचे सभापती सतीष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या संकल्पनेतून करण्यात आले असून ०२ मे २०२२ ते १० जून २०२२ पर्यंत कै.पि.के.शिंदे माध्यमिक विद्यालय, विवेकानंद नगर, पाचोरा येथे सुरू करण्यात येणार आहेत.
दहावीच्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करत या क्लासेस चे आयोजन करण्यात आले असून पाचोरा तालुक्यातील विद्यार्थ्यांना या क्लासेसचा लाभ कसा घेता येणार आहे.
क्लासेसची वैशिष्ट्ये
अनुभवी व तज्ञ शिक्षक वर्ग २)व्यक्तिगत मार्गदर्शनावर भर
प्रत्येक विषयाचे सखोल मार्गदर्शन
हमखास यशाची खात्री
दररोज ३ तास टीचिंग
६० विद्यार्थ्यांची स्वतंत्र बॅच
सेमी व मराठी दोन्ही माध्यम
दररोज ५ तास तासिका
इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करण्यासाठी 9359009590, 8080989046 या व्हाट्सअप नंबर वर आपले संपूर्ण नाव, मोबाईल नंबर, पत्ता, माध्यम, शाळेचे नाव पाठवावे