जळगाव लाईव्ह न्यूज । ३० एप्रिल २०२२ । राज्यासह जळगाव जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून तापमानाचा पारा कमालीचा वाढला असून उष्णतेच्या लाटेमुळे एप्रिल महिन्यातच जळगावकर हैराण झाले आहेत. मे महिन्यातील तापमानाची तीव्रता यंदा एप्रिल महिन्यापासूनच जाणवायला लागली आहे. काल शुक्रवारी भुसावळ सह जळगावच्या तापमानाची नोंद ४६.४ इतकी करण्यात आली आहे. वाढत्या उन्हामुळे उष्माघात हाेण्याचा धाेका असून दुपारी १२ ते ४ या काळात बाहेर पडणे टाळावे अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या.
उत्तर भारतातून एकामागून एक उष्णतेच्या लाटा निर्माण होत असल्याने उष्णतेच्या तीव्र झळांनी नागरिक हैराण झाले आहेत. तर राज्यासह जळगाव जिल्ह्यात देखील तापमानात वाढ होत आहे. पश्चिम राजस्थानमध्ये उष्णतेच्या लाटेची स्थिती तीव्र झाली आहे. त्यामुळे आगामी दोन ते चार दिवसांत २ ते ४ अंशांनी वाढ होण्याची शक्यता असून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात तापमानवाढ कायम राहण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे.
यापूर्वी गुरुवारी जळगावचा पारा देशात तिसऱ्या क्रमांकाने सर्वाधिक पोहोचला होता. तापमानाचा पारा वाढला असल्याने सकाळपासूनच उन्हाचे चटके बसत आहे. प्रचंड उष्णतेमुळे जळगावातील नागरिकांना कामासाठी घराबाहेर पडताना अक्षरश: कसरत करावी लागत होती. दरम्यान. वाढत्या उन्हामुळे उष्माघात हाेण्याचा धाेका असून दुपारी १२ ते ४ या काळात बाहेर पडणे टाळावे अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या.
जळगावातील आजचे दिवसभरातील तापमान (Jalgaon Temperature) असे?
वेळ – अंश
१२ वाजेला – ३९ अंश
१ वाजेला- ४१ अंशापुढे
२ वाजेला – ४२ अंश
३ वाजेला – ४२ अंशापुढे
४ वाजेला – ४३ अंश
५ वाजेला – ४४२ अंश
६ वाजेला – ४१ अंश
७ वाजेला – ३३९ अंश
आणि रात्री ८ वाजेला ३७ अंशावर स्थिरावणार.