⁠ 
शुक्रवार, डिसेंबर 13, 2024
Home | जळगाव जिल्हा | भुसावळ | Railway News : शिक्षकांच्या सन्मानार्थ धावणार ‘स्पेशल ट्रेन’, वाचा संपूर्ण वेळापत्रक

Railway News : शिक्षकांच्या सन्मानार्थ धावणार ‘स्पेशल ट्रेन’, वाचा संपूर्ण वेळापत्रक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२२ । कोरोना निर्बंध उठविल्यानंतर तसेच उन्हाळ्यात होणारी गर्दी लक्ष्यात घेता रेल्वेकडून अनेक गाड्या चालविल्या जात आहे.अशातच ईशान्य रेल्वे आणि मध्य रेल्वेने आता देशातील शिक्षकांच्या सन्मानार्थ ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई ते बनारस दरम्यान सुपरफास्ट टीचर्स स्पेशल ट्रेन चालवण्याची घोषणा रेल्वेकडून करण्यात आली आहे. ही गाडी भुसावळ विभागातून धावणार असल्याने प्रवाशांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

मुंबई ते बनारस दरम्यान सुपरफास्ट टीचर्स स्पेशल ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 2 मे रोजी निघेल आणि मध्य प्रदेश मार्गे दुसऱ्या दिवशी उत्तर प्रदेशातील बनारसला पोहोचेल. विशेष म्हणजे या ट्रेनमध्ये फक्त शिक्षकांनाच मुंबईहून आय-कार्डच्या आधारे तिकीट मिळणार आहे. तर सामान्य प्रवाशांनाही परतीच्या ट्रेनमध्ये प्रवास करण्याची परवानगी आहे. ट्रेनमधील प्रवाशांना कोविड-19 नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल.

01053 लोकमान्य टिळक टर्मिनस – बनारस टीचर्स स्पेशल ट्रेन सोमवार, ०२ मे रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १०.३० वाजता, कल्याणहून ११. १० वाजता निघेल, नाशिक येथून दुपारी २ वाजता, भुसावळ येथून सायंकाळी ६.४० वाजेल, खंडवा येथून रात्री ८ वाजेला, इटारसी येथून २२.४० वाजता, दुसऱ्या दिवशी बिना येथून 02.40 वाजता, वीरांगना लक्ष्मीबाई जं. सकाळी ५ वाजता, गोविंदपुरी सकाळी ९. ३० वाजता, फतेहपूर १०.३७ वाजता आणि प्रयागराज जं. ती ग्यानपूर रोडवरून १३. १० वाजता सुटेल आणि १५.३० वाजता बनारसला पोहोचेल.

परतीच्या प्रवासात, ०१०५४ बनारस – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी बनारस येथून मंगळवार, ३ मे २०२२ रोजी सकाळी २०.०० वाजता सुटेल आणि ज्ञानपूर रोडवरून रात्री ८ वाजून ४७ वाजता, प्रयागराज जंक्शन येथून सुटेल.रात्री १०.४५ वाजता, फतेहपूर 00.39 वाजता, गोविंदपुरी 02.05 वाजता, वीरांगना लक्ष्मीबाई जंक्शन सकाळी ६ वाजता, बीना सकाळी ०८.३५ वाजता, इटारसी दुपारी १२.३० वाजता, खंडवा दुपारी ०२.०५ वाजता, भुसावळ येथे सायंकाळी ०४.२५ वाजता, तर कल्याणहून रात्री १२ वाजून ०३ मिनिटाने निघून ती १ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल

या ट्रेनमध्ये 01 एसी फर्स्ट क्लास, 03 एसी सेकंड क्लास, 04 एसी थर्ड क्लास, 08 स्लीपर क्लास, 06 जनरल सेकंड क्लास आणि 02 एसएलआरडी डबे असे एकूण 24 कोच टाकण्यात येणार आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.