जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२२ । येथील लोकशाही जोशी प्रतिष्ठान तर्फे रस्त्यावर फिरणाऱ्या मनोरुग्णांचे पुनर्वसन करण्यात आले. शहरात तापमानात ४ ते ५ दिवसांपासून वाढत आहे. अशातच अंगावरील ताेकड्या कपडयांनिशी देहभान हरपून रस्त्यावर एक प्राैढ लाेळत हाेता. त्याची या यातनेतून लाेकशाहीर सखाराम जाेशी प्रतिष्ठानने मुक्तता करून त्याच्या पुनर्वसनाची जबाबदारीही स्वीकारली.
अधिक असे की, शहरातील पांडे डेअरी चौकाच्या आवारात विपन्नावस्थेत रखरखत्या उन्हात रस्त्यावर पहुडलेला पन्नाशी पार केलेला प्राैढ लोकशाहीर सखाराम जोशी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संग्राम जोशी यांना दिसला. त्यांनी चौकशी केली असता त्याच्या पायाला व शरीराला ठिकठिकाणी जखमा झालेल्या होत्या. ती व्यक्ती कोठून आली, तिचे नाव काय, याबाबतची स्वत:ची माहितीदेखील देऊ शकत नव्हती. त्यांची माहिती विचारण्याचा प्रयत्नही केला; परंतु ती व्यक्ती बोलू शकत नव्हती. अत्यंत दयनीय अवस्था पाहून त्याची जबाबदारी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी घेण्याचे ठरवले. या व्यक्तीच्या उपचारासाठी ज्या आवश्यक कायदेशीर बाबी असतात त्यांची पूर्तता करून त्याची चोपडा येथील मानव सेवा संस्थेकडे रवानगी करण्यात आली. या कामी संस्थेचे अध्यक्ष संग्राम जोशी, संस्थेचे सचिव संदीप जोशी, किशोर कुलकर्णी, जगदीश नेवे, वैजनाथ पाटे, अजय काथार, हर्षल शेळके, अनिल जोशी, अर्चना जोशी, योगेश सुतार यांचे विशेष सहकार्य लाभले.