जळगाव जिल्हा

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शिधापत्रिकांचे वाटप

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२२ । तालुक्यातील पाळधी येथील ३० गरजू कुटुंबांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते नुकतेच शिधापत्रिका वाटप करण्यात आले.

सदर उपक्रम जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांच्या मार्गदर्शनाने धरणगाव पंचायत समितीचे माजी सभापती मुकुंद नन्नवरे यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून तत्काळ एका आठवड्यात या शिधापत्रिका गरजूंसाठी उपलब्ध करून दिल्या. या वेळी धरणगावचे तहसीलदार नितीनकुमार देवरे, सहकारी गणेश पवार यांचे सहकार्य लाभले. यावेळी चांदसरचे सरपंच सचिन पवार, शरद कोळी, भूषण महाजन, गोपाळ सोनवणे यासह शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button