जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२२ । आशिया खंडातील सर्वात मोठी सोसायटी असलेल्या ग.स.सोसायटीच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया गुरुवारी पार पडत आहे. जळगाव मनपाच्या महापौर जयश्री महाजन हा सभासद असल्याने सकाळीच त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.
जळगाव जिल्हा ग.स.सोसायटीच्या निवडणुकीची रणधुमाळी संपली असून यंदा पंचरंगी लढत पाहायला मिळणार आहे. निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया गुरुवारी पार पडत आहे. सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. महापौर जयश्री महाजन या स्वतः शिक्षिका असून ग.स.सोसायटीच्या सभासद देखील आहेत. सकाळीच त्यांनी प.न.लुंकड कन्या शाळा या केंद्रावर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
ग.स.सोसायटी आशिया खंडातील वैशिष्ट्यपूर्ण आणि मोठी सोसायटी आहे. ग.स.च्या निवडणूक प्रक्रियेत सर्व सभासदांनी सहभागी होत आपला मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन महापौर जयश्री महाजन यांनी केले आहे.