जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२२ । धरणगाव तालुक्यातील पिंपळेसीम शिवारातून २५ हजार रुपयांच्या अॅल्युमिनिअम तारेची चोरी झाल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी येथील पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
सहाय्यक अभियंता हर्षल भागवत नेहते (वय २९, रा. आसोदा, जि. जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २६ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेच्या दरम्यान, अज्ञात चोरट्याने २५ हजार रुपये किंमतीची अंदाजे २१६० मीटर लांबीची अँल्युमिनियम तार, गट क्र.६३/१ पिंपळेसीम शिवारातून चोरुन नेल्याने गुन्हा दाखल झाला.