जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२२ । शेंदुर्णी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहायिका राजश्री तुळशीराम पाटील यांना ‘प्लोरेन्स नाईटिगेल’ पुरस्कार जाहीर झाला आहे. जागतिक परिचारिका दिनी १२ मे रोजी हा पुरस्कार वितरित करण्यात आहे. नर्सिंग सेवेतील अत्युच्च सेवेसाठी हा पुरस्कार देण्यात येतो.
शेंदुर्णी केंद्रास सलग तीन वर्षांपासून डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार मिळत आहे. याच केंद्रातील आरोग्य सहायिका राजश्री पाटील यांना जिल्ह्याचा प्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार सलग पाच वर्षांपासून मिळाला आहे. त्यामुळे त्यांना आता राष्ट्रीय स्तरावरील फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्कार कधी मिळेल याची प्रतीक्षा होती. ती आता संपली आहे.