⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 19, 2024
Home | जळगाव जिल्हा | भुसावळ | भुसावळात पुन्हा खून, एकाचा मृतदेह आढळला

भुसावळात पुन्हा खून, एकाचा मृतदेह आढळला

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२१ । भुसावळ शहरात मोकळ्या जागेत एका व्यक्तीचा मध्यरात्री मृतदेह आढळून आल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, मृतदेहाच्या चेहर्‍याला दगडाने ठेचल्याचे दिसून येत असल्यामुळे त्याचा खून झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

भुसावळ शहरातील लिंपस क्लब परिसरातील रिक्षा स्टॉपजवळच्या मोकळ्या जागेत एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाच्या चेहर्‍याला दगडाने जखमा केल्याचे दिसून येत असून खून झाला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. मयताच्या उजव्या हातावर एस गोदलेले आहे. दरम्यान, या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसल्यामुळे पोलिसांना थोड्या अडचणी आल्या आहेत. मात्र हा घातपाताचाच प्रकार असल्याचे समजते.

दरम्यान, घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे,बाजारपेठ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चाँडक,शहर पोलीस स्टेशनचे बाबासाहेब ठोंबे,पोकॉ संकेत झांबरे,पोकॉ.विकास सातदिवे,कृष्णा देशमुख,बंटी कापडणे तसेच पोलीस कर्मचारी दाखल झाले असून तपास सुरू करण्यात आला आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.