जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२२ । येथील सिंधी कॉलनीत एका व्यापाऱ्याचे बंद घर फोडून सुमारे ५ लाखांचा मुद्देमाल चोरटयांनी लांबविल्याची घटना उघडकीस अली आहे. तब्बल अडीच लाखाची रोकड आणि सोन्याचे दागिने चोरटयांनी लबाबिले आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, सिंधी कॉलनीतील साधना आश्रम जवळील कंवर नगरातील रहिवासी रोहीत ईद्रकुमार मंधवानी (वय-३०) यांचे बळीराम पेठेत होम अप्लायन्स नावाने किचन वेअरचे दुकान आहे. रोहीत याच्या आत्याच्या मुलाचे लग्न असल्याने ते कुटुंबियांसह २२ रोजी रात्री १० वाजता अमरावतीला घर बंद करून गेले होते. लग्नाचा कार्यक्रम आटोपून ते सोमवारी २५ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घरी परतले असता, त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा तुटलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांनी घरात जावून पहिले असता हॉल, बेडरुम, किचन व स्टोर मधील सामान अस्ताव्यवस्त फेकलेला होता. घरातील लोखंडी कपाटाचे लॉक तुटलेले दिसून आले. तसेच कपाटात ठेवलेले सात तोळे सोन्याची दागिने व अडीच लाख रुपयांची रोकड त्यांना दिसून आली नाही. मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवलेल्या व्हीएचए कंपनीच्या ४० मिक्सरच्या मोटारी देखील चोरीस गेली. याबाबत रोहित मंधवानी यांनी तातडीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून घटनेची माहिती देत तक्रार दाखल केली. त्यावरून दि २५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास एमआयडीसी पोलीस कर्मचारी करीत आहेत.