⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
Home | जळगाव जिल्हा | युवारंग महोत्सवात गरुड महाविद्यालयाने पटकविले दोन पदके

युवारंग महोत्सवात गरुड महाविद्यालयाने पटकविले दोन पदके

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२२ । कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि पूज्य साने गुरुजी महाविद्यालय शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने युवारंग महोत्सवाचे आयोजन झाले. या विद्यापीठस्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला. या युवारंगात गरुड महाविद्यालयाच्या संघाने रजत व कांस्यपदक मिळवले.

यात सुमिता पाटील या विद्यार्थिनीने व्यंगचित्र कला प्रकारात उत्कृष्ट सादरीकरण करत रजत पदक प्राप्त केले. गायत्री पाटील, स्नेहल वाघ, भूषण हिवाळे, धर्मेश्वरी गुजर यांच्या संघाने इंन्स्टॉलेशन कलाप्रकारात उत्कृष्ट सादरीकरण करीत कांस्यपदक प्राप्त केले. या स्पर्धेत महाविद्यालयातील एकूण १० विद्यार्थ्यांचा संघ सहभागी झाला होता. त्यात अंजलिका हटकर, महेंद्र घोंगडे, अक्षय पवार, स्वप्नील जाधव व रंजना कुमावत यांनी इतर कला प्रकारात उत्कृष्ट सादरीकरण केले. डॉ.ए.एन.जिवरग, डॉ.योगिता चौधरी, डॉ.दिनेश पाटील यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले. संस्थेचे अध्यक्ष संजय गरुड, सचिव सतिश काशीद, संचालिका उज्ज्वला काशीद, दीपक गरुड, प्राचार्य डॉ.वासुदेव पाटील यांनी अभिनंदन केले.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह