जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२२ । येथील सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या अध्यक्षपदी अभिजित पाटील, मानद सचिवपदी दिनेश थोरात तर कोषाध्यक्ष म्हणून उमेश पाटील यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.
यावेळी मावळते सचिव राजेश चौधरी यांनी कार्य अहवाल सादर केला. अध्यक्ष श्रीहर्ष खाडीलकर यांनी मनोगत व्यक्त केले. कोषाध्यक्ष डॉ. भावना चौधरी यांनी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सदस्यांचा परिचय करून दिला. नूतन अध्यक्ष अभिजित पाटील यांनी कोअर कमिटीची घोषणा केली. यात छबीराज राणे, विनीत जोशी, श्रीधर इमानदार, व्ही. पी. कुळर्णी, अभिजित वाठ, सचिन दुनाखे, श्रीहर्ष खाडीलकर, डॉ. भावना चौधरी, राजेश चौधरी, रश्मी गोखले, दीपक पाटील, ॲड. निखिल कुळकर्णी, जयेश पाटील, कृणाल महाजन, डॉ. वृषाली छापेकर आदींचा समावेश आहे.
रिजनल हेड म्हणून श्रीहर्ष खाडीलकर यांची तर वुमन्स विंग हेड डॉ. वृषाली छापेकर यांची निवड करण्यात आली. आकांक्षा कुळकर्णी यांनी विंगच्या उपक्रमाविषयी माहिती दिली. कार्यक्रमात खासदार डॉ. पाटील, व डॉ. अजित मराठे यांनी मार्गदर्शन केले. संग्राम लिमये, संजय देसले, नितीन पाटील, प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल, प्रा. डॉ. शिल्पा बेंडाळे, प्रा. डॉ. भूषण चौधरी उपस्थित होते.