जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२२ । भादली बुद्रुक येथे विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या निवडणूकीत १३ पैकी ९ संचालक शिवसेनेसह महाराष्ट्र विकास आघाडीतील पक्षांचे निवडून आले आहेत. नवनिर्वाचित संचालकांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली.
सोसायटीत शिवसेना प्रणीत मविआ पॅनलने बहुमत मिळवले आहे. संचालक म्हणून मनोहर महाजन, जितेंद्र नारखेडे, हर्षल नारखेडे, राजेंद्र अत्तरदे, संदीप कोळी, अनिल नारखेडे, प्रकाश धनगर, विद्या सोपान कोल्हे व हेमलता प्रकाश नारखेडे हे निवडून आले. यासाठी पुरुषोत्तम पाटील, दगडू चौधरी, आबा कोळी, छगन खडसे, सलीम पिंजारी, नजीर पटेल, हेमंत कोल्हे, डिगंबर रडे, दिलीप रडे, राजू ढाके यांनी परिश्रम घेतले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पी.के.विरकर व सहाय्यक म्हणून गुणवंत पाटील यांनी या निवडणुकीचे काम पाहिले.