जळगाव लाईव्ह न्यूज । २४ एप्रिल २०२२ । कवी,लेखक प्रकाश तेली यांच्या ‘सडक सुरक्षा’ या हिंदी कवितासंग्रहाचे शुक्रवारी जळगावात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, संजय सावकारे, शिरीष चौधरी, अॅड. किरण तेली व इतर मान्यवर उपस्थित होते.
तेली यांच्या सडक सुरक्षा काव्यसंग्रहात रस्ते अपघाताचे मानवी जीवनावर होणारे दुष्परिणाम, त्यावर उपाय अशा विविध पैलूंवर प्रकाश टाकणाऱ्या ५० कविता आहेत. देशातील रस्ते अपघात रोखण्यासाठी शासन स्तरावर आणि विविध सामाजिक संस्थांकडून प्रयत्न व कार्य सुरू आहे. त्यांच्या प्रयत्नांना अधिक चालना मिळावी या भावनेने सर्व कविता लिहिल्या आहे. रस्ते अपघाताच्या समस्येकडे सर्वांचे लक्ष वेधणे, रस्ते अपघातात दररोज हजारोंचे जीव जातात त्याला प्रतिबंध करण्याचा प्रयत्न अनेक कवितातून करण्यात आ ला आहे. तेली यांनी आतापर्यंत विविध सामाजिक विषयांवर तब्बल चार हजारांहून अधिक कविता, दोन हजाराहून अधिक कोट्स लिहिले आहेत. तसेच वीज, अन्न सुरक्षा, रोजगार, पाणी, पर्यावरण, शिक्षण, राष्ट्रीय एकात्मता, व्यसन, प्रदूषण, बालविवाह या विषयावर कवितासंग्रह लिहिले आहे.
प्रकाश तेली यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करताना मंत्री नितीन गडकरी.