⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | भडगाव | कजगाव येथे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप‎

कजगाव येथे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप‎

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२२ । ‎ भडगाव तालुक्यातील कजगाव येथे जिल्हा परिषद कन्या‎ शाळेतील व चमकवडी येथील जिल्हा ‎परिषदेच्या प्राथमिक शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थिनींना ‎पुणे येथील सेवा सहयोग‎ फाउंडेशनच्या गुणवंत सोनवणे यांच्या ‎सहकार्याने शैक्षणिक साहित्य‎ भेट देण्यात आले.‎ या दोन्ही शाळेतील गरजू‎ विद्यार्थ्यांना स्कूल किटचे वाटप‎ करण्यात आले.

या लोकनायक‎ तात्यासाहेब महेंद्रसिंग राजपूत प्रतिष्ठान‎ संचालित हिरकणी महिला मंडळाच्या‎ अध्यक्षा सुचित्राताई पाटील, सेवा‎ सहयोग ग्रामोदय प्रकल्पाचे सोमनाथ‎ माळी, सरपंच वैशाली पाटील, दिनेश‎ पाटील, राहुल पाटील, कजगाव येथील‎ ‎ कन्या शाळेचे शाळा व्यवस्थापन‎ समितीचे अध्यक्ष दत्तात्रय महाजन,‎ उपाध्यक्ष अमृता पाटील, सदस्य नासिर‎ खाटीक, आधार साठे, प्रवीण महाजन,‎ केंद्र शाळेच्या व्यवस्थापन समितीचे‎ अध्यक्ष पुंडलिक सोनवणे,‎ मुख्याध्यापिका रंजना भांडारकर या‎ ‎मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थिनींना‎ स्कूल किटचे वाटप करण्यात आले.‎ या वेळी पालक उपस्थित होते. कन्या‎ शाळेचे मुख्याध्यापक सुनील महाजन‎ यांनी सूत्रसंचालन केले. या‎ कार्यक्रमाला पालकांची माेठ्या‎ संख्येने उपस्थिती हाेती.‎

author avatar
टीम जळगाव लाईव्ह