जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२२ । राणा दाम्पत्यांनी आम्ही उद्धव ठाकरे यांच्या घरा बाहेर हनुमान चालीसा ऐकवणार अशी घोषणा केली आणि गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत राजकीय आंदोलन पेटले आहे. शनिवारी सकाळपासूनच शिवसेना कार्यकर्त्यांनी मातोश्रीबाहेर आणि नवनीत राणा यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर गर्दी केली होती.यावेळी शिवसैनिकांनी मुंबई उद्धव साहेबांची नाही कोणाच्या बापाची या घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला हो
“पंतप्रधानांच्या कार्यक्रमाचे कारण सांगून राणा दांपत्य पळ काढत आहे. आव्हानाची भाषा करत ते मुंबईत आले होते आणि आता घरात लपून बसले आहेत. त्यामुळे त्यांनी ज्यापद्धतीने मुंबईतील कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचे काम केले आहे. त्यामुळे जोपर्यंत ते माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांनी बाहेर पडू नयू अशी सर्व शिवसैनिकांची इच्छा होती. मात्र पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केली . आता पुढे काय होतेहे पाहावे लागणार आहे.