जळगाव लाईव्ह न्यूज | २३ एप्रिल २०२२ । तांत्रिक बिघाडामुळे वाघूर पाणीपुरवठा पंपिंग स्टेशनचा वीज पुरवठा अडीच तास खंडीत झाल्याने शहरात शनिवारी दाेन तास उशिराने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
वाघूर पाणीपुरवठा पंपिंग स्टेशन येथील महावितरण कंपनीच्या उच्च दाब वीज वाहिनीवर तांत्रिक बिघाड झाल्याने २२ एप्रिल राेजी वीज पुरवठा दु.१.३० ते ४.०५ वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडीत झाला हाेता. या मुले शनिवारी होणार पाणीपुरवठा दोन तास उशिराने करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.