जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२२ । अमळनेर तालुक्यातील माध्यमिक शाळेतील मुलांच्या सायकली चोरणारा गौरव महाले व ताडेपुरा भागात घरफोडी करणाऱ्या सुनील गव्हाणे अशा दाेघांना अमळनेर पोलिसांनी अटक केली आहे.
१९ एप्रिल रोजी निकुंभ प्लाझा येथून अज्ञात चोरट्याने एका मुलाची सायकल चोरून नेली होती. त्यानंतर त्या मुलाचे वडील जितेंद्र शरद पाटील (रा.अमळगाव) यांनी अमळनेर पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली. ही घटना शहरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली होती. त्यानंतर पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी मिलिंद भामरे आणि सूर्यकांत साळुंखे यांना फुटेजच्या आधारे आरोपीला शोधण्यास सांगितले होते. हा तरुण शिरूड नाका परिसरातील गौरव प्रमोद महाले असल्याचे निष्पन्न झाल्याने पाेलिसांनी त्यास अटक केली. त्याच्याकडून चोरीच्या आणखी तीन सायकली जप्त केल्या आहेत. तर २० रोजी रात्री ताडेपुरा भागात संजय प्रभाकर सैंदाणे यांच्या बंद घराचा पत्रा उचकावून चोरट्याने घरातील २५ हजार रुपये चोरून नेले होते. चोरी करताना काहींनी ताडेपुरा भागातील मंगल नगरमधील सुनील दगडू गव्हाणे याला पाहिले होते.