⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | दर्जेदार कलावंतांनी गाजवला युवारंग युवक महोत्सव

दर्जेदार कलावंतांनी गाजवला युवारंग युवक महोत्सव

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२२। युवारंग युवक महोत्सवाचा गुरुवारचा दिवस विडंबननाट्य, मुकनाट्य, समुहगी वादविवाद, सुगम गायन भारतीय, कोलाज, क्ले मॉडेलिंग आणि स्पॉट पेटींग या कला प्रकारातील दर्जेदार कलाविष्कारांनी गाजला. 

माबाईलचे दुष्परिणाम, शहिद जवानांच्या घटनांवर राजकारण, अखंड भारत अशा एक-ना-अनेक विषयांवर सादर झालेल्या दर्जेदार कलाविष्कारांनी गाजतोय युवारंग. विविध कलाप्रकारांमुळे विद्यार्थ्यांना मिळालेले हक्काचे व्यासपीठ अनेकांनी गाजवत आपल्यातील कलेचा परिचय दिला. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग आणि पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र व कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी पाच रंगमंचावर सकाळपासून विविध कलाप्रकारांच्या स्पर्धा सुरू झाल्या. सर्वच रंगमंचावरून प्रेक्षकांचे मनोरंजन आणि विविध संदेश देण्यात आले. 

पुज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना युनिटने क्रांतीविर खाज्या कक्ष उभारून त्यात आर्ट गॅलरी सजवली आहे. या आर्ट गॅलरीत पोस्टर्स, रांगोळी, हस्तचित्रांच्या माध्यमातून पर्यावरणाचे सरक्षण, वृक्षतोड, कापडी पिशव्यांचा वापर, अंधश्रध्दा निमूर्लन, लेक वाचवा या विषयावर जनजागृती करीत आहेत. रासेयोचे स्वंयसेवक प्रेक्षकांना माहिती देत आहेत. 

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.