जळगाव लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२२ । तालुक्यातील चिंचोली येथील माहेर असलेल्या विवाहितेचा पाच लाख रुपयांसाठी छळ केल्याने पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, चिंचोली येथील काजल सुनील गोसावी यांचा विवाह मध्यप्रदेशातील भोपाळ येथील सुनील अशोक गोसावी यांच्यासोबत झाला असून लग्नानंतर काही दिवसातच पतीसह सासरच्यांनी काजल हिच्याकडे माहेरुन पाच लाख रुपये आणावेत व संसारपयोगी साहित्य आणावे असा तगादा लावला होता. याच कारणावरुन पतीसह सासरच्यांनी काजल हिचा दोन वषापर्यंत वेळावेळी मानसिक तसेच शारिरीक छळ केला. या जाचाला कंटाळून अखेर काजल या माहेरी निघून आल्या होत्या व याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात ठाण्यात सासरच्या मंडळींविरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रारीवरुन बुधवारी काजलचे पती सुनील अशोक गोसावी, अशोक प्रल्हाद गोसावी, हिराबाई अशोक गोसावी, विद्या सचिन गोसावी, वर्षा पुरूषोत्तम पाटील सर्व रा गोविंदपुरा, हुजरआण्णानगर, भोपाळ, मध्यप्रदेश या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गफूर तडवी हे करीत आहे.