जळगाव लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२२ । खान्देशात बोलली जाणारी भाषा लेवा गणबोली, अहिराणी या दोन्ही भाषांना आता मोठ्या रंगमंचावर चांगलीच संधी मिळाली आहे.
युवारंगातून आपले कलाविष्कार सादर करून सातत्याने मू.जे. महाविद्यालयाच्या संघांचे व्यवस्थापक राहिलेले हेमंत पाटील यांनी महाराष्ट्राची हास्य जत्रा या विनोदी कार्यक्रमात स्थान मिळवले आहे. हास्य जत्रा या कार्यक्रमात चाळीसगाव तालुक्यातील श्याम राजपूत व जळगावचे हेमंत पाटील यांनी लेवा गणबोली, अहिराणी भाषेत विनोद करत छाप पाडली आहे. हेमंत पाटील, वैभव मावळे यांनी भाषेचा न्यूनगंड सोडून तिचा शक्ती म्हणून वापर करण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला आहे. अहिराणी व लेेवा गणबोलीची गोडी व्यावसायिक नाटक, मिमिक्रीमधून निर्माण झाली आहे. त्याचा फायदा घेण्यासाठी युवारंग ही मोठी संधी ठरणार आहे.