जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२२ । किर्तास फाऊंडेशन, जळगाव यांच्यावतीने सुप्रसिद्ध कवी दिवंगत ज़ाकीर उसानी यांच्या स्मरणार्थ नशिस्त (छोटे खाणी मुशायरा) आणि संमेलन “ लाएँ कहाँ से फन की दुरबिं हम ” या शीर्षकाने हजरत शेख-उल-हिंद उर्दू प्राथमिक शाळा मेहरून येथे नुकतेच आयोजित करण्यात आले. ज़ाकीर उस्मानी यांचे सुपुत्र तौक़िर उस्मानी यांच्या हस्ते शमा फारोजी (दीपप्रज्वलन) करून कार्यक्रमाचे उद्ग्घाटन करण्यात आले.
क़य्युम राज़ यांनी ज़ाकीर उसानी यांच्याशी असलेली साहित्यिक ओढ व्यक्त केली. या संमेलनाला संबोधित करताना प्रमुख वक्ते सय्यद ज़ाकीर अली म्हणाले, आजच्या युगात रक्ताचे नाते दूर होत चालले आहेत आणि अशा वेळी एखाद्याच्या साहित्यिक सेवेचा गौरव करायचा असेल, तर खरोखरच तो आणि त्याच्या लेखनाला सलाम करावा लागेल. त्या साहित्यिकाचे किती चांगले रचना त्याने केले यातून कळते. या साहित्यिक कार्यक्रमाच्या पहिल्या सत्राचे अध्यक्षपद भूषवणारे शेख जय्यान अहमद म्हणाले की, त्यांच्या मूल्याबद्दल आणि दर्जाविषयी बोलणे वावगे ठरणार नाही.
आम्ही क़िर्तास तर्फे लवकरच जाकीर उस्मानिंच्या साहित्य व कलेवर आयोजित राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्र आयोजित करणार आहोत. काजी राफिकोद्दिन आणि रफिक पटवे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. दुसऱ्या सत्राची अध्यक्षता ज्येष्ठ शायर कय्युम राज़ रझ मारुली यांनी भूषविली. शकील मेवाती, हफीज मीना नागरी, अख्लाक़ निजामी, अनीस कैफी, शकील अंजुम, वकार सिद्दीकी, मुश्ताक साहिल, साबीर आफ़ाक, अरशद नजर, यांनी झाकीर उस्मानी यांच्यावरील कविता वाचली. या वेळी नसीर पठाण, डॉ. शफिक नाजीम, क़िर्तास फाऊंडेशनचे जानिसार अख्तर, सैयद अल्ताफ अली, साजिद अख्तर, आसिफ पठाण, तबरेज अस्लम, जुबेर मुसा, डॉ. अनिसोद्दिन, अश्फ़ाक़ तसव्वुर, वसिम शाह आदी उपस्थित होते.