सहकारी संस्थेची १२ संचालक बिनविरोध

एप्रिल 20, 2022 4:49 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२२ । अमळनेर तालुक्यातील नंदगांव-तासखेडा व सानेनगर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची पंचवार्षीक निवडणूक बिनविरोध पार पडली.

nivdnuk jpg webp

सहकारी संस्थेची २०२२ ते २०२७ या कालावधीसाठी ही निवडणूक बिनविरोध झाली. सर्वसाधारण प्रवर्गातून जगन पाटील, खुशाल पाटील, योगेश पाटील, प्रमोद बडगुजर, बाबुलाल पाटील, रामकृष्ण पाटील, महेश पाटील, भास्कर पाटील, इमाव प्रवर्गातून शरद पाटील, अनु.जाती जमातीमधून गोबा भिल, महिला राखीवमधून रत्नाबाई पाटील, शकुंतला पाटीलयांची १२ संचालक पदी बिनविरोध निवड झाली. एन.टी.प्रवर्गातील जागा रिक्त राहिली आहे. व्ही.एम.जगताप यांनी या निवडणुकीचे काम पाहिले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now