जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२२ । मुंदाणे जिल्हा परिषद मराठी शाळेत शाळा पूर्वतयारी मेळावा झाला. मेळाव्याचे उदघाटन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील यांच्याहस्ते झाले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य राजकुमार पाटील, मुख्याध्यापक किरण पाटील, उपशिक्षक अलका चौधरी, वैशाली देसले, मनीषा पाटील, पालक, अंगणवाडी सेविका व बालक उपस्थित होते. अंगणवाडीतील सहा वर्षांपुढील विद्यार्थ्यांना बोलावून गुलाब पुष्प व चॉकलेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. शाळेविषयी विद्यार्थ्यांमध्ये आकर्षण निर्माण करणे व आनंददायी शिक्षण कशा पद्धतीने देता येईल या उद्देशाने पालकांमध्ये जागृती निर्माण करणे, असा मेळाव्याचा उद्देश होता. उपशिक्षिका अलका चौधरी यांनी ही माहिती दिली. मुख्याध्यापक किरण पाटील यांनी मार्गदर्शन केले.

सूत्रसंचालन मनीषा पाटील यांनी केले, वैशाली देसले यांनी आभार मानले.








