⁠ 
शनिवार, सप्टेंबर 21, 2024
Home | बातम्या | Election : जळगाव मनपा प्रभाग समितीच्या चारही जागा बिनविरोध

Election : जळगाव मनपा प्रभाग समितीच्या चारही जागा बिनविरोध

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ळगाव लाईव्ह न्यूज । १८ एप्रिल २०२२ । महानगरपालिकेच्या चार प्रभाग समिती सभापती निवडीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी शेवटचा दिवस होता. दरम्यान, सभापती पदासाठी प्रभाग समिती क्र. १ मध्ये रुक्सानाबी खान, प्रभाग समिती क्र. २ मध्ये भाजपचे मुकुंदा सोनवणे, प्रभाग समिती क्र. ३ मध्ये एमआयएमच्या सुन्ना बी. देशमुख तर प्रभाग समिती क्र. ४ मध्ये पार्वताबाई भील्ल यांनी नगरसचिव सुनील गोराणे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले. चारही प्रभाग समिती सभापती पदासाठी एकमेव उमेदवारी अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्‍चित झाली आहे. दरम्यान, दि. २० रोजी होणार्‍या विशेष सभेत अधिकृत निवड घोषित केली जाणार आहे.


प्रभाग समिती सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर ही निवड बिनविरोध व्हावी यासाठी सत्ताधारी शिवसेनेने भाजपाशी समन्वय साधला. त्यानुसार भाजपला एक जागा सोडण्यात आली. एक जागा एमआयएमला तर दोन जागा शिवसेनेला पाठींबा देणार्‍या बंडखोर नगरसेवकांना देण्यात आली आहे. सभापती निवडीसाठी अर्ज दाखल करण्याची सोमवारी अंतीम मुदत होती. त्यानुसार सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. प्रभाग समिती क्र. १ साठी रुक्सानाबी खान यांनी अर्ज दाखल केला. त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून दिलीप पोकळे तर अनुमोदक म्हणून नवनाथ दारकुंडे यांची स्वाक्षरी आहे. प्रभाग समिती क्र. २ साठी भाजपाचे मुकुंदा सोनवणे यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून भगत बालाणी तर अनुमोदक म्हणून रंजना सोनार यांची स्वाक्षरी आहे. प्रभाग क्र. ३ साठी सुन्नाबी देशमुख यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून रियाज बागवान तर अनुमोदक म्हणून सईदा शेख यांची स्वाक्षरी आहे. तसेच प्रभाग क्र. ४ साठी भाजपच्या बंडखोर नगरसेविका पार्वताबाई भील्ल यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून ललित कोल्हे तर अनुमोदक म्हणून कुलभूषण पाटील यांची स्वाक्षरी आहे. उमेदवारी अर्ज दाखल करतांना शिवसेनेतर्फे मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, नगरसेवक नवनाथ दारकुंडे, गणेश सोनवणे तर भाजपतर्फे राजेंद्र घुगे पाटील, सदाशिव ढेकळे, विशाल त्रिपाठी, महेश चौधरी, महानगर प्रमुख दीपक सूर्यवंशी, नगरसेविका ऍड. शुचिता हाडा, दिपमाला काळे, रंजना सोनार, गायत्री राणे आदी उपस्थित होते

author avatar
टीम जळगाव लाईव्ह