जळगाव लाईव्ह न्यूज । १८ एप्रिल २०२२ । उन्हामुळे त्वचेच्या समस्या उद्भवण्यास सुरुवात झाली आहे. चुकीचे क्रिम लावल्याने अथवा काळजी न घेतल्याने त्वचेचे गंभीर आजार समोर येण्याची शक्यता आहे.यामुळे नागरिकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही क्रीम वापरू नये असा सल्ला डॉक्टर देत आहेत.
त्वचेच्या प्रत्येक आजार बारा होण्याची आपली एक वेळ असते. काही आजार लवकर बरे होतात व काही उशिरा बरे होतात. त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्यावीत. लवकर ठीक होण्यामागे त्वचेवर काहीही प्रयोग केल्यास त्वचा कायमची खराब होऊ शकते.असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.