जळगाव लाईव्ह न्यूज । १८ एप्रिल २०२२ । येथील ऑटो नगरातून फोरव्हीलर वाहन चोरून नेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, अयोध्यानगरीतील रहिवासी लक्ष्मीकांत बाळकृष्ण फटांगडे (वय-६९) यांनी १० एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता त्यांची कार क्रमांक (एमएच १९ एपी ८८०) हि ऑटोनगर येथील हिंदुस्तान इंजिनिअरिंग वेल्डिंगच्या दुकानासमोर लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी हि कार चोरून नेल्याचे ११ एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजता उघडकीला आले. अखेर त्यांनी १७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दाखल केली. त्या नुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक मुदस्सर काझी हे करीत आहेत.