खर्ची येथील घरकुलाच्या यादीत घोळ,ग्रामस्थांचे जिल्हाधीकार्यांना निवेदन
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ एप्रिल २०२२ । एरंडोल तालुक्यातील खर्ची खुर्द येथील घरकुल यादीत घोळ झाल्याने या प्रकरणाची चौकशी करावी अशा आशयाच्या मागणीसाठी गावातील ग्रामस्थांनी आज दि १८ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन सादर केले.
सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, एरंडोल तालुक्यातील खर्ची खुर्द १५६ घरकुल लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली होती. यामध्ये १२१ जनांच्या नावाची घरकुल यादी तयार करण्यात अली आहे. खुर्द ग्रामपंचायत मध्ये वाचन न करता परस्पर ग्रामपंचायत सदस्यांच्या सह्या घेऊन ती पंचायत समिती एरंडोल येथे दाखल केली होती. नव्याने दुसरी यादीत ७ जणांचे नाव घोषित करण्यात आले. यात देखील गरजू लाभार्थ्यांचे नाव दिसून आले नाही. यासंदर्भात एरंडोल पंचायत समितीला चौकशीचे मागणी केली होती. त्यानुसार चौकशी अहवाल प्राप्त झालेला आहे. खर्ची खुर्द येथील घरकुल यादीत मोठ्या प्रमाणवर घोटाळा झालेला असून त्याची नि:पक्षपणे चौकशी करण्यात यावी आणि गरजू लाभार्थ्यांना न्याय मिळावा असे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या घरकुल योजनेचा लाभ गरजू लाभार्थ्यांना मिळावा यासाठी ही योजना सुरू केली. परंतु स्थानिक प्रशासनाकडून चुकीच्या पध्दीतीने अंमलबजावणी होत असल्याने गरजूंना या योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. दरम्यान प्रशासनाने आयपी कोडच्या माध्यमातून चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर दिलीप मराठे, अजितसिंग पाटील, चंद्रजित पाटील, मंगल भिल, किशोर पाटील यांच्यासह आदी ग्रामस्थांच्या सह्या आहे.