कच्च्या तेलाचा पुन्हा भडका ! वाचा आजचे पेट्रोल-डिझेलचे दर
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२२ । आज पेट्रोलियम कंपन्यांकडून आज रविवारी इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले. या नव्या दरानुसार आज देशात इंधनाचे दर स्थिर आहेत. सलग १२ व्या दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केला नाही. त्यामुळे तूर्त दरवाढीला ब्रेक लागला. मागील महिन्यात पेट्रोल आणि डिझेल १० रुपयांनी महागले.
आज जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार जळगावमध्ये एका लिटर पेट्रोलचा दर १२१.६९ रुपये इतका आहे. तर डिझेलचा दर १०४.३४ रुपये इतका आहे. तर मुंबईमध्ये पेट्रोल,डिझेलचा दर अनुक्रमे 120.51 आणि 104.77 रुपये एवढा आहे. तर राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 105.41 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 96.67 रुपये एवढा आहे. पुण्यात पेट्रोलचा भाव प्रति लिटर 120.30 रुपये असून, डिझेल 104. 30 रुपयांवर पोहोचले आहे. नागपूरमध्ये पेट्रोलचे भाव प्रति लिटर 120.15 तर डिझेल 102.89 रुपये लिटर आहे. रंगाबादमध्ये पेट्रोल 120.15 तर डिझेल 104.40 रुपये लिटर आहे.
आज कच्च्या तेलाच्या दरात तेजी दिसून येत आहे. कच्च्या तेलाचे (crude oil) दर 9 टक्क्यांनी वाढले असून, ते 111.23 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. तर दुसरीकडे शनिवारी जेट फ्यूलचे (Jet fuel) दर देखील वाढवण्यात आले आहेत. मात्र देशात आजही पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर असल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.