भुसावळ
भुसावळ येथे जामनेरराेडवर आज बारागाड्या
जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२२ । आज शुक्रवारी भुसावळ शहरात अष्टभूजा देवीच्या बारागाड्या ओढल्या जातील. सायंकाळी ६ वाजता जामनेर रोडवरील शनिमंदिर ते अष्टभुजा देवी मंदिरापर्यंत या बारा गाड्या ओढण्यात येतील.
गेल्या आठवड्यात सतारे भागात बारा गाड्या ओढताना दुर्घटना झाली होती. गाड्यांसाठी सापडून एका प्रौढाचा मृत्यू, तर चौघे जखमी झाले होते. या पार्श्वभूमीवर जामनेर राेडवरील बारागाड्यांसाठी पाेलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.