⁠ 
शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024
Home | बातम्या | राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वादविवाद वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वादविवाद वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ एप्रिल २०२२ । राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वादविवाद वक्तृत्व स्पर्धा येथील चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या एस.एम.ए. सायन्स अँड के.के.सी. कॉमर्स कॉलेज आणि के. आर. कोतकर ज्युनिअर काॅलेज आयाेजित करण्यात आल्या आहेत. १९ आणि २० एप्रिल असे दोन दिवस या स्पर्धा होतील.


डाॅ. पूर्णपात्रे चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्याने, कै. गोपाळ नारायण उपाख्य भय्यासाहेब पूर्णपात्रे स्मृतिकरंडक वक्तृत्व, श्रीमती सीताबाई अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्टतर्फे श्रीमती सीताबाई मांगीलाल अग्रवाल स्मृतिकरंडक वादविवाद आणि शकुंतलाबाई अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्टतर्फे नारायणभाऊ अग्रवाल गौरवार्थ उत्स्फूर्त वक्तृत्व राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा १९ व २० एप्रिल असे दाेन दिवस हाेणार अाहेत. यंदा या स्पर्धेचे ३६ वे वर्ष आहे. उद््घाटन १९ राेजी सकाळी १० वाजता साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक श्रीकांत देशमुख (नांदेड) यांच्याहस्ते संपन्न होणार आहे. यानंतर स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण २० एप्रिल राेजी दुपारी ४ वाजता नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉ. बी. बी. चव्हाण यांच्याहस्ते हाेईल.


या दोन्ही कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी चाळीसगाव एज्युकेशन साेसायटीचे चेअरमन नारायण अग्रवाल हे असतील. या राज्यस्तरीय स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे अावाहन अवाहन महाविद्यायाचे प्राचार्य, प्रा. डॉ. एम. व्ही. बिल्दीकर, उपप्राचार्य डॉ. प्रकाश बाविस्कर, उपप्राचार्य डॉ. ए. व्ही. काटे, उपप्राचार्य प्रा. बी. आर. येवले व स्पर्धा संयोजक प्रा. डॉ. वि. रा. राठोड यांनी केले आहे. दरम्यान, कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्याने स्पर्धेला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह