जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२१ । थोर समाज सुधारक, शेतक-यांचे कैवारी, स्त्री शिक्षणाचे उद्गाते महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनाच्यावतीने अभिवादन करण्यात आले.
अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांच्या हस्ते महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी महसूल निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी, सहाय्यक पुरवठा अधिकारी प्रशांत कुलकर्णी, आर. एस. पाटील, अमोल जुमडे, सुयोग कुलकर्णी आदि उपस्थित होते.