जळगाव लाईव्ह न्यूज । १२ एप्रिल २०२२ । बहुतांश बँकांनी मुदत ठेवींच्या (FD) व्याजदरात वाढ केली असताना, इंडियन ओव्हरसीज बँकेने मुदत ठेवी (FD) व्याजदरात कपात करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच आता या बँकेत एफडी करण्यावर गुंतवणूकदारांना कमी व्याज मिळणार आहे. ही वजावट 2 कोटी रुपयांपर्यंतच्या वेगवेगळ्या कालावधीच्या मुदत ठेवींवर करण्यात आली आहे.
इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) च्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, FD च्या व्याजदरात 40 बेसिस पॉइंट्स म्हणजेच 0.40 टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली आहे. नवीन दर 11 एप्रिल 2022 पासून लागू झाला आहे. बँक ज्येष्ठ नागरिकांना दीड टक्क्यांपर्यंत जास्त व्याज देत आहे.
IOB चे नवीन व्याजदर
7 दिवस ते एक वर्ष कालावधीच्या FD वर फक्त 3 टक्के दराने व्याज मिळेल. गुंतवणूकदारांना आता 46 ते 90 दिवसांच्या एफडीवर केवळ 4 टक्के आणि 91 दिवस ते 179 दिवसांच्या मुदत ठेवींवर 3.5 टक्के दराने व्याज मिळेल. बँक आता 180 दिवसांपेक्षा जास्त आणि एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी केलेल्या FD वर 4.5 टक्के व्याज देत आहे. मुदत ठेवींच्या व्याजदरात एक वर्षापासून ते तीन वर्षांपर्यंत कोणताही बदल झालेला नाही. किमान एफडी मर्यादा रु 1 लाख आहे.
ज्येष्ठ नागरिकांना दीड टक्के अधिक व्याज
इंडियन ओव्हरसीज बँकेच्या वेबसाइटनुसार, ज्येष्ठ नागरिकांना बँक एफडीवर अर्धा टक्के (०.५ टक्के) जास्त व्याज दिले जात आहे. तर बँक सुपर ज्येष्ठ नागरिकांना (80 वर्षे आणि त्यावरील नागरिक) 2 कोटी रुपयांपर्यंतच्या मुदत ठेवींवर 0.75 टक्के अधिक व्याज देत आहे.