जळगाव लाईव्ह न्यूज । उमेश पाटील । महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पाळधी बु. येथे जय सावता माळी मित्र मंडळतर्फे अभिवादन करण्यात आले.
जय सावता माळी मित्र मंडळतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध विषयांवर मार्गदर्शन करून महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्याला उजाळा दिला. या प्रसंगी जय सावता माळी मित्र मंडळ तर्फे अमोल माळी, योगेश माळी, रुपेश माळी, संजय माळी, घनश्याम माळी, सदिप माळी, समाधान माळी व पपरिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमोल माळी, योगेश माळी, रुपेश माळी, संजय माळी, घनश्याम माळी, सदिप माळी आदींनी परिश्रम घेतले.