जळगाव लाईव्ह न्यूज । १२ एप्रिल २०२२ । मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि काेकण-गाेव्यात येत्या १४ एप्रिलपर्यंत अवकाळीचे सावट कायम राहणार असल्याचे भारत हवामान विभागाने साेमवारी जाहीर केलेल्या साप्ताहिक अंदाजानुसार वर्तविले आहे.
या काळात उच्च तापमानासह ढगाळ वातावरण असेल. उकाड्यात वाढ हाेईल. मध्य महाराष्ट्रात अवकाळीचे पावसाची अधिक शक्यता वर्तवण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यात साेमवारी ४२ अंश सेल्सिअस इतके तापमान नाेंदविण्यात आले. साेमवारी सकाळच्या वेळी उत्तर-पश्चिम दिशेने ताशी १४ किलाेमीटर वेगाने वारे वाहिले.