वाणिज्य

आता 24 तास आणि आठवड्याचे सातही दिवस सुरु राहणार बँक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ एप्रिल २०२२ । बँक एका विशिष्ट आणि ठराविक वेळेतच (Bank Timings) सुरु असतात. सध्यातरी असंच आहे. पण लवकरच बँका आठवड्याचे सातही दिवस आणि चोवीस तास सुरु राहणार आहेत. त्याअनुशंगानं आता आरबीयानं (RBI) पावलं टाकायलाही सुरुवात केली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात (Centre Budget 2022) बँकांच्या 24 तास आणि सातही दिवसांच्या कामाचा मुद्दा नमूद करण्यात आला होता.

त्यानंतर आता आरबीआयकडून या धर्तीवर बँका सुरु करण्यासाठी पुढील पावलं उचलली जात आहेत. जनधन बँक अकाऊंटनतर आता चोविस तास लोकांना बँकिंग सेवांचा लाभ घेता येऊ शकेल. अर्थसंकल्पात 75 जिल्ह्यात 75 डिजिटल बँक युनिट्स अर्थात DBU उघडण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता या DBU साठी गाईडलाईन्सही जारी करण्यात आल्या आहेत.

आरबीआयनं जारी केलेल्या गाईडलाईन्स देशातील सर्व व्यावसायिक बँकांनाही लागू असणार आहेत. यात ग्रामीण बँक, पेमेन्ट्स बँख आणि लोकल बँकांना वगळण्यात आलंय. डिजिटल बँकिंग युनिट्स नेमकं आहे काय आणि त्याचा नेमका फायदा कुणाला होणार आहे, हे समजून घेऊया.

डिजिटल बँकिंग युनिट्स नेमकं असणार काय?

DBU म्हणजेच डिजिटल बँकिंग युनिट्स! गेल्या काळात ATM शब्द आणि त्याची सेवा जशी सर्वसामान्यांमध्ये रुजली, त्याचप्रमाणे येत्या काळात DBU ही प्रचलित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच धर्तीवर आता प्रयत्न सुरु कऱण्यात आले आहे. आरबीआयनं डीबीयूबाबत आपल्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. डीबीयू नेमक्या कशा असतील? त्या सर्वसामान्य बँकेसारख्या असतील की वेगळ्या असतील? याबाबत आता लोकांच्या मनात प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button